Consumer Guidance Service Centre
|
|||||
![]() |
|
चळवळीच्या लोकयात्रेला 1974 मध्ये
प्रारंभ झाला. आज या चळवळीला लोकमान्यता,राजमान्यता व न्यायामान्यता प्राप्त झाली आहे.ग्राहक
पंचायत ही स्वायत्त व सेवाभावी संघटना असून तिचे शुद्ध भारतीय तत्वज्ञान आता सर्वदूर
मान्य झाले आहे. स्वयंसेवी संघटना,तत्वज्ञानाची शास्त्रशुद्ध बैठक आणि प्रजातंत्राची
उंची वाढवणारी स्वतंत्र कार्यशैली यामुळे या चळवळीला स्वतःचा चेहरा मिळाला आहे. गेल्या
काही वर्षात अर्थव्यवहाराचे स्वरूप इतक्या वेगाने बदलत चालले आहे की त्यातून ग्राहकांपुढे
नवनव्या समस्या निर्माण होत आहेत. कोणत्याही सेवा आणि वस्तूंचे नको इतके व्यापारीकरण
होत आहे. अत्याधुनिक प्रसार माध्यमांचा वापर करून ग्राहकांना भ्रमित केले जात आहे.
सेलच्या रूपाने नको त्या वस्तू घरात येत आहेत. भेसळयुक्त अशुद्ध पदार्थ पोटात शिरत
आहेत.
माणसांच्या भावना भडकावून गरज निर्माण केली जात आहे. खरे काय आणि खोटे काय? श्रेयस
काय आणि प्रेयस काय? हे कळेनासे झाले आहे. एका बाजूने सामान्य माणूस व्यापार व उदिमांच्या
भूलाभूलैयाच्या कोलाहलात सापडला आहे तर दुसरीकडून वीज, परिवहन, दूरध्वनी आरोग्य घरबांधणी
नागरीसेवा बेदरकार होत चालल्या आहेत ज्यांनी कायद्याची कार्यवाही करायची तेच कायदा
धाब्यावर बसवून ग्राहकांची अडवणूक करत आहेत. सामान्य माणसाला या परिस्थितीचे चटके आणि
अनेक फटके बसत आहेत.आजचा काळ विचित्र आहे दारिद्र्याच्या आपण दंडकारण्यात सुखाची बाग
शोधत आहोत दुःख लपवण्यासाठी आनंदाचा makeup करून जगत आहोत.
ग्राहक मार्गदर्शन सेवा केंद्र आजची ही परिस्थिती लक्षात घेऊन
लोक्तांत्रातील सर्व पथ्ये सांभाळून ग्राहक कल्याणाची लढाई जिंकण्यासाठी प्रत्येक नगरात
व गावात ग्राहक मार्गदर्शन सेवा केंद्र सुरु झाले पाहिजे.ग्राहक पंचायतीच्या चिंतनाला
कृतीची जोड देण्यासाठी अशी ग्राहक मार्गदर्शन केंद्रे महत्वाची भूमिका बजावू शकतात.
समर्पण वृत्तीने आणि सेवाभावी प्रवृत्तीने केलेले कार्य उदात्त असते म्हणून केंद्राच्या
कामातील सेवाभाव अति महत्वाचा आहे.कार्यकर्त्यांचा आचार हाच संघटनेच प्रचार आहे.
केंद्राचे स्वरूप
केंद्राची निचित जागा असावी. एखाद्या सेवाभावी वृत्तीच्या नागरिकाच्या जागेमध्ये केंद्राचे
काम चालावे.
अशी पाटी तेथे असावी. स्थानिक सोयीनुसार कामाच्या वेळांची माहिती असावी.विषयावर तज्ञांनी
त्या त्या दिवशी व वेळी मार्गदर्शनासाठी उपस्थित असावे.लहानसे वाचनालय उभारावे वृतापात्रीया
कात्रणे CPR,CPJ यासारखी कायद्याची पुस्तके संदर्भासाठी असावीत. सुव्यवस्थित फायलिंग
असावे आठवड्यात सात विषयांचे सात तज्ञ जर या केंद्रात बसतील तर सामान्य ग्राहकांना
फार मौलिक मार्गदर्शन आपण या मधून करू शकतो
कार्यपद्धती
तक्रार घेऊन येणाऱ्या ग्राहकांचे नाव, संपूर्ण पत्ता, दूरध्वनी क्रमांक यांची रजिस्टर
बूक मध्ये नोंदणी असावी. तक्रारी लिखीत स्वरुपात असाव्यात. त्यासाठी विहीत नमुन्याचा
फॉर्म उपलब्ध असावा. ग्राहकाला मार्गदर्शन करून स्वतःच संबंधितांना पत्र पाठविण्यास
सांगावे किंवा भेटण्यास सांगावे. नंतर आवश्यकतेनुसार ग्राहक पंचायतीच्या वतीने पत्र
पाठवावे.
न्यायमंचात तक्रार नेणे आवश्यक असेल तर त्याबद्दल तद्न्याँकडून कायदेविषयक सल्ला दिला
जावा. ग्राहक पंचायतीचे हे कार्य स्वयंसेवी स्वायत्त स्वरूपाचे आहे आणि ' आपल्या समस्या
सोडविण्याची ग्राहक म्हणून आपणच उभे राहिले पाहिजे.' ही मानसिकता समाजात उत्पन्न वाह्वी,
समस्या निराकरणासाठी परस्पर सहकार्याने तडजोडनामा करण्याचा प्रयत्न व्हावी , संवाद
व समन्वय साधला जाऊन कटूता कमी होईल. वेळ व पैसा वाचेल. या कार्यपद्धती मध्ये हे लक्षात
घ्यावे की तक्रार घेऊन येणाऱ्या ग्राहकांने स्वतः हालचाल केली पाहिजे. आपणच आपल्या
अंगावर तक्रार घेऊन स्वतः धापवळ करणे याने मार्गदर्शन केंद्राच्या हेतूला धक्का लागेल.
आजकाल आपली तक्रार सोडविण्यासाठी माणसे लावून काम करून घेण्याची प्रवृत्ती वाढते आहे.
याला खतपाणी घालू नये.
काही पथ्ये
१) आपले दुख ऐकणारा कुणीतरी आहे असे ग्राहकाला वाटावे. आपले केंद्र हे ग्राहकांना आपले
प्रश्न आपल्या व्यथा मांडण्याचे हक्काचे व्यासपीठ वाटावे केंद्राने प्रश्न सोडवणारे
ठेकेदार होऊ नये.ग्राहकाला समर्थ करावे. तसेच तक्रार निवारणाचे अर्ज टाकण्यासाठी Letter
box लावू नये.प्रत्यक्ष ग्राहकाची भेट होणे त्याच्याशी बोलणे होणे आणि ग्राहक पंचायतीच्या
कार्याशी त्याचा परिचय होणे आवश्यक आहे. २) मार्गदर्शन सेवाकेंद्रामध्ये वकील या शब्दाला
आणि व्यवसायाला जागा नाही.आपण कोणताही वकील सुचवू नये
निधी व्यवस्था
केंद्र सेवा केंद्र म्हणून चालवले जाणार असल्याने कोणत्याही ग्राहकाकडून त्याच्या कामाचा
मोबदला किंवा फी घेऊ नये. सारेच काही पिशवीत न्यायचे नसते, काही हृदयातही जपायचे असते.
परंतु हे कार्य प्रभावीपणे चालावे म्हणून ग्राहकाकडून ऐछिक निधीची अपेक्षा आहे.यासाठी
ग्राहक मार्गदर्शन सेवा केंद्र ही ग्राहक पंचायतीची शक्तीकेंद्रे व्हावीत.ती स्वयंसिद्ध
करावीत, समाजाला शोषण मुक्त करावे, दरिद्रीनारायानाचा सेवक व्हावे.